तोंडात पाणी आणणारी भरल्या वांग्याची रेसिपी ...
भरली वांगी हि मध्य महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध अशी डिश आहे. जी खूप चवीने खाल्ली जाते.
त्या साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-
१) लहान - माध्यम आकाराची वांगी ५-६,
२) तेल २ मोठे चमचे,
३) चवी नुसार मीठ ,
४) पाणी गरजेनुसार
मसाल्यासाठी लागणारे साहित्य:-
१)सुक खोबरं अर्धी वाटी ,
२) तीळ २ चमचे ,
३)शेंगदाणे १ छोटी वाटी ,
४)आलं - लसूण चवीनुसार ,
५) तिखट ३ चमचे ,
६)गरम मसाला २ चमचे ,
७)हळद अर्धा चमचा ,
८)धने पूड १ चमचा ,
९)मीठ चवीनुसार .
कृती :-
१.सर्वप्रथम वंगांसाठी लागणार मसाला बनवून घ्यावा.
सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून तव्यावर भाजून घ्यावे. त्या सोबतच तीळ, शेंगदाणेपण भाजून घ्यावे.
२. भाजल्या सर्व वस्तू मिक्सर मध्ये घालावयत , त्यामध्ये आलं -लसूण, मीठ, हळद , गरम मसाला , तिखट , धणेपूड हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. या मध्ये पाणी घालू नये .
३. सुके वाटण एका प्लेट मध्ये काढून घ्यावे.
४. वांगी धुवून घ्यावीत. त्यांची देठ काढून टाकावीत, त्याना मधून चिरा माराव्यात त्यात थोड मीठ घालावे.
त्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यावा . उरलेला मसाला बाजूला ठेवावा.
५. कढई गरम करावी, त्यात थोडे तेल टाकावे. त्यामध्ये वांगी सोडावीत आणि झाकण ठेवावे. ५ ते १० मिनिट्स मंद आचेवर शिजू द्यावी .
६. वांगी शिजल्यावर त्यात गरजेनुसार पाणी घालावे त्यासोबत उरलेला मसाला घालावा . एक उकळी येऊ द्यावी.
नंतर सर्व्ह करावी .
७. स्वद्दिष्ट अशी भरली वांगी तयार आहेत . गरम गरम खावीत .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा