सकाळच्या नाश्त्याला गरमागरम ताकातली तांदळाची उकड…
साहित्य : -
- तांदळाचे पीठ छोटी वाटी,
- ताप एक फुलपात्र,
- दोन तीन हिरव्या मिरच्या,
- हिंग एक चमचा,
- जिरं मोहरी फोडणीसाठी,
- हळद एक चमचा,
- पाणी
कृती. : -
- प्रथम एका भांड्यात एक फुलपात्र भरून ताक घ्यावे.
- त्यात तांदळाची पिठी घालून एक सारखे करून घ्यावे ते थोडे घट्ट झाले असल्यास, त्यात थोडे पाणी टाकावे.
- एक सारखे करून घ्यावे एकदम पातळ पेस्ट करून घ्यावी.
- टीप :- ताक जर आंबट असेल तर त्यात थोडे पाणी जास्त घालावे.
- गॅसवर कढई ठेवून त्यात थोडेसे तेल घालून घ्यावे तेल तापल्यावर त्यात फोडणी घालावी.
- फोडणीत मिरचीचे तुकडे घालावेत एक चमचा हिंग पावडर घालावी नंतर मिक्स केलेली पेस्ट घालावी त्या पेस्टमध्ये थोडीशी हळद घालावी,
- चमच्याने हलवत राहावे आणि थोडं नंतर झाकण ठेवून एक वाफ आणावी.
- आपल्याला ज्या प्रमाणे थोडी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे वाफ आणावी
तुम्हाला नक्कीच आवडेल गरम खाण्यातच मजा येते सकाळच्या नाश्त्याला करून पहा.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा