डिंकाचे चविष्ट लाडू...

तयार डिंकाचे लाडू असे दिसतात 

साहित्य:-

  • बारीक डिंक 125 ग्रॅम
  • काजू 100 ग्रॅम
  • बदाम 100 प्रेम
  • बेदाणे 100 ग्रॅम
  • खजूर 100 ग्रॅम (खजुराच्या बिया काढून घ्याव्यात)
  • खसखस 50 ग्रॅम
  • पिस्ता 50 ग्रॅम
  • खारीक पूड 100 ग्रॅम
  • साजूक तूप 1 किलो एवढं सगळं लागत नाही 
  • अर्धा किलो (५००ग्रॅम ) किसलेला ऑरगॅनिक गूळ 
  • आपल्याला जर अजून ड्रायफूट टाकायचे असल्यास ते पण आपण टाकू शकतात. 

कृती:-

  • प्रथम कढईत साजूक तूप घेऊन, गॅस मंद आचेवर ठेवून तूप तापवून घ्यावे.  
  • तूप तापल्यावर त्यात प्रथम डिंक तळून घ्यावा. एका टाटा मध्ये पसरत ठेवावा, जर आपल्याला आवडत असेल तर डिंकाचे प्रमाण वाढवू शकतात.
  • डिंकतळून झाला की त्याच कढईमध्ये थोडं तूप असेल त्यातच काजू बदाम पिस्ते बेदाणे खजूर खसखस, खारीक पूड हे सर्व वेगवेगळे एकाच कढईमध्ये भाजून घ्यावे तसेच वेगवेगळे काढून घ्यावे ते थंड झाले की मिक्सरमधून त्याची पूड करून घ्यावी, 
  • खजूर सुद्धा तुपात भाजून मिक्सरमधून फिरवून घ्यावे त्यामुळे लाडवाला एक प्रकारचे गोडी येते.  खसखस आणि खारीक पुड मिक्सर मधून काढून घेऊन नये ते बारीक असल्याने तसंच घ्यावे.  
  • एका पसरट भांड्यात डिंक हाताने चुरून घ्यावा (थोडा अख्खा ठेवावा). आपण जे बारीक केलेले सामान आहे ते सर्व व त्यात टाकावे. 
  • त्यामध्ये खसखस आणि खारीक पूड तसेच थोडी वेलची पूड पण टाकावी सर्व सारण एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये बारीक किसलेला गुळ थोडा-थोडा करून घालावा.  
  • एका पातेल्यात तूप गरम करून घ्यावे आणि ते सारण एकत्र कालवून त्याचे लाडू वळता येतात का हे बघावे नसेल येत तर त्यामध्ये थोडे तूप टाकावे व लाडू वळावा. 
  • गुळाचे प्रमाण चव घेऊन बघावे. अजून जर गोड पाहिजे असेल तर यामध्ये थोडा गुळाचे प्रमाण वाढवावा.
  • परत थोडे तूप टाकून सगळं मिक्स करून छोटे छोटे लाडू तयार करून घ्यावेत भरपूर दिवस टिकतात. 
हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत , बाळंतिणीला तर हा लाडू एकदमच पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही हे करूनच बघा सगळ्या नाही हा लाडू खायला कुरकुरीत आणि मस्त लागेल!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट