बनवायला सोपे गोडे शंकरपाळे...

गोड शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे:-
१) बारीक रवा एक वाटी,
२) मैदा तीन वाट्या,
३) तूप एक वाटी,
४) साखर एक वाटी,
५) चिमुटभर मीठ,
६) तळण्यासाठी तेल,
७) एक वाटी पाणी,

गोड शंकरपाळे बनवण्याची कृती:-
१) सर्वप्रथम तूप साखर आणि पाणी एका पातेल्यात घ्यावे. ते मंद आचेवर उकळून घ्यावे. त्यात चिमुटभर मीठ घालावे ते थंड होण्यास ठेवावे.
२) थंड झाल्यावर त्यात जेवढा मावेल तेवढा रवा आणि मैदा टाकावा आणि कटके सारखे मळून घ्यावे.
३)पीठ मळून झाल्यावर त्याच्या पोळ्या लाटून घ्याव्या व आपल्याला हवे तसे आकाराचे शंकरपाळे पाडावे. त्याच वेळी गॅस वर तेल गरम करत ठेवावे.
३) शंकरपाळे मंद आचेवर गरम तेलात तळून घ्यावे.

अशाप्रकारे आपले गोडे शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट