झटपट तयार होणारा रवा डोसा...

रवा डोसा साठी लागणारे साहित्य:-
१) रवा तीन वाट्या
२) दोन टोमॅटो
३) एक मध्यम आकाराचा कांदा
४) आलं-लसूण
५) चार-पाच हिरव्या मिरच्या
६) एक वाटी तांदळाची पिठी
७) दोन छोटे चमचे कणीक
८) चवीनुसार मीठ
९) पाणी


कृती:-
प्रथम कांदा टोमॅटो लसुन मिरची हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे त्यामध्ये रवा थोडीशी कणीक एक वाटी तांदळाची पिठी घालावी.
हे सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यामध्ये लागेल तसे पाणी घालावे.
चवीनुसार मीठ पण घालावे. डोसे घालता येतील एवढेच पाणी
घालावे. एकदम पातळ पीठ करू नये.
नॉनस्टिक तवा मिडीयम गॅस वर तापवून घ्यावा. तवा तापल्यावर
त्यावर थोडेसे तेल टाकून. त्यावर डोसा घालून घ्यावा. वरून झाकण ठेवावे. नंतर दोन मिनिटांनी डोसा पलटी करावा.
अशातऱ्हेने रवा डोसा तयार होईल.
धरम धरम रवा डोसा नाश्ता साठी तयार आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट