खान्देशीप्रकारचे उडदाच्या डाळीचे चमचमीत वडे !

आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन. कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळे करून खावे. असे वाटते. तेव्हा तुम्ही चवीला चटकदार आणि आणि खायला खुसखुशीत असा उडदाचा वडा करून पहा. तुम्हाला तो नक्कीच आवडेल.
उडदाच्या डाळीचे वडे

उडदाच्या डाळीच्या वड्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे:-

१) उडदाची डाळ दोन वाट्या,
२) एक चमचा बडीशेप,
३) लसणाच्या पाच-सहा पाकळ्या,
४) आलो एक दीड इंच,
५) धने दोन चमचे,
६) मीठ चवीनुसार,
७) पाणी,
८) कोथिंबीर थोडीशी,
९) तळण्यासाठी तेल,
१०) पाच ते सहा मिरच्या.

उडदाच्या डाळीचे वडे बनवण्याची कृती:-

प्रथम उडदाची डाळ पाच-सहा तास भिजत घालावी. ती चांगली धुऊन घ्यावी. नंतर डाळीमधले पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये
डाळ वाटून घ्यावी. डाळ वाटताना त्यामध्ये पाणी टाकू नये.
मिक्सरमध्ये आलं लसूण मिरची धने बडिशोप हे सर्व वाटून घ्यावे.
वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून ते हाताने पुन्हा एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये मीठ कोथिंबीर घालावी व ते पुन्हा हाताने मिक्स करून घ्यावे. एक प्लास्टिकचा छोटा कागद घेऊन.
त्यावर मिश्रणाचा छोटा गोळा ठेवावा. छोट्या वाटीत थोडे पाणी घ्यावं.ते पाणी त्या कागदाला थोडंच लावून त्यावर तो गोळा ठेवावा. बोटाला थोडेसे पाणी लावून त्या गोळ्याचा वडा थापावा.
कढईत तेल गरम करून घ्यावे.
गरम तेलात तोडा बोटांवर घेऊन सोडावा. गॅस थोडा मिडीयम वरच ठेवावा. ह्या वाड्यांमध्ये मी थोडं जास्तच घालावे.
वडा थोडा जाडसर थापावा. कढईत वडा सोडून तळून घ्यावा.
अशाप्रकारे आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार होतील.



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट