टेस्टी मुगाची घावन
घवनसाठी लागणारे साहित्य:-
१) अख्खे मुग एक मोठी वाटी,
२) हिरवी मिरची पाच ते सहा,
३) आलं एक ते दीड इंच,
४) लसूण चार-पाच पाकळ्या,
५) एक मध्यम आकाराचा कांदा,
६) पाणी,
७) तेल,
८) एक छोटी वाटी तांदूळ,
९) थोडीशी कोथिंबीर,
१०) मीठ
कृती:-
प्रथम अख्खे मुग भिजत टाकावे ; तांदूळ सुद्धा भिजत घालावे
हे रात्रभर भिजवून सकाळी वाटून घ्यावे मिक्सरमध्ये, मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये हिरवी मिरची; आलं-लसूण, कांदा कापून मिक्सरमध्ये वाटून घ्यावं, त्यात थोडी कोथिंबीर पण वाटून घ्यावी,
हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यावं त्यात थोडं चवीनुसार मीठ घालावे व घ न घालता येतील एवढेच पाणी घालावं, नॉन स्टिक तवा तापवून घ्यावा, त्यावर थोडं तेल टाकून पळीने घावन घालावी,
त्यावर झाकण ठेवावे, दोन-तीन मिनिटांनी झाकण काढून,
घावन पलटी करून घ्यावे,
अशा रीतीने आपले हिरव्या मुगाचे पौष्टीक घावन खाण्यासाठी तयार आहे.


छान रेसिपी आहे.
उत्तर द्याहटवा