नारळीपोर्णिमी निमित्त नारळाची वडी...
साहित्य :-
१) एक नारळ
२) दीड वाटी साखर
३) वेलची पूड
४) थोडंसं तूप
कृती :-
- प्रथम नारळ खोउन घ्यावे, साखर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावी.
- नंतर खोवलेला नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.गॅसवर कढई तापत ठेवावी, गॅस हळूच ठेवावा.
- नारळाचा चव (सारण) दोन वाट्या असेल तर त्यात दीड वाटी पिठीसाखर घालावी कढईत. आता सारण हलवत राहावे, त्यात वेलची पूड टाकावी. ते ओलसर घट्टसर असे व्हायला लागले की गॅस बंद करावा,
- एका थाळीला थोडंसं तूप लावून घ्यावं, त्यात ते सारण टाकाव.ते त्या थाळीत पसरावे, हाताला थोडे तूप लावून थापून घ्यावे, सुरीला थोडं तूप लावून त्या सारणाच्या वड्या पाडून घ्याव्यात.
- परत हाताने ते सारण थापून घ्यावे, नंतर ते गार करायला ठेवावे,गार झाल्यावर सुरीने वड्या काढून घ्याव्यात.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा