खानदेशी भाजी - डाळ मेथी

साहित्य:-

१) मेथी दाणे एक चमचा,
२) तुरीची डाळ एक मूठ,
३) दोन मध्यम आकाराचे कांदे,
४) सुकं खोबरा,
५) एक इंच आलं,
६) चार-पाच लसणाच्या पाकळ्या,
७) हिरव्या मिरच्या पाच-सहा,
८) भाजलेल्या शेंगदाणे दोन चमचे,
९) थोडी हिरवी कोथिंबीर,
१०) पाणी,
११) मीठ,
१२) गरम मसाला,
१३) धने जिरे पावडर,
१४) तेल,

 कृती:-

  1. प्रथम तव्यावर किंचित तेल टाकून मेथीदाणा भाजून घ्यावा, तुरीची डाळ धुऊन घ्यावी व त्यामध्ये मेथीदाणे टाकावे ते कुकरात वाफवून घ्यावे. 
  2. तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घ्याव्यात, खोबऱ्याचे बारीक तुकडे करून ते पण भाजावेत, कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून त्या पण भाजून घ्याव्यात, सगळे पदार्थ भाजुन गार झाले की मिक्सरमध्ये टाकावेत त्यात आले लसुन टाकून वाटून घ्यावे वाटताना थोडे पाणी टाकावे नंतर कोथिंबीर टाकून वाटून घ्यावे बारीक वाटावे.
  3. गॅसवर कढई ठेवून तापत ठेवावे त्यात थोडे दोन पळीभर तेल टाकावे. तेल तापले की आपण जो मसाला तयार केला आहे तो टाकावा.
  4. त्यात हळद थोडी धने पावडर गरम मसाला टाकावा थोडावेळ शिजू द्यावे झाकण ठेवून. । ।  
  5. या मसाल्याला थोडं तेल सुटत चाललं की त्यात आपण वाफवलेले तूर डाळ व मेथीदाण्याचे मिश्रण टाकावे आपल्याला जेवढा रस्सा पातळ हवा त्याप्रमाणे पाणी टाकावे आपल्या अंदाजानुसार त्यात मीठ घालावे,
  6. हे सर्व हळू गॅस वर करावे नंतर भाजीला उकळी आणावी,
अशाप्रकारे खानदेशी पद्धतीची डाळ मेथी ची भाजी तयार आहे,
ही भाजी जरूर करून बघा अजिबात कडू लागत नाही.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट