जाळीदार पाव डोसा घरच्या घरी उत्तम पद्धतीने !
साहित्य:-
१) दोन वाट्या तांदूळ,
२) एक चमचा मेथी दाणे,
३) अर्धी वाटी जाड पोहे,
४) मीठ,
५) पाणी,
६) तेल,
कृती:-
- प्रथम एका भांड्यात तांदूळ आणि एक चमचा मेथी दाणे घेऊन ते चांगले धुऊन घ्यावेत, सकाळी भिजत घालावे,
- संध्याकाळी ते मिक्सरमधून वाटून घ्यावेत, त्याच वेळी अर्धा वाटी पोहे धुऊन घ्यावेत, पाच मिनिटे भिजत ठेवावे, नंतर ते मिक्सर मधून वाटून घ्यावेत,
- तुम्ही मिश्रण एकत्र करून हलवून घ्यावेत, नंतर ते झाकून रात्रभर तसेच ठेवावे (जर आपल्याकडे ओले खोबरे असेल तर ते सुद्धा थोडे वाटून टाकले तरी चालते,)
- सकाळी जेव्हा आपल्याला डोसे करायचे तेव्हा ते पीठचमच्याने हलवावे त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकावे हलवून घ्यावे त्यात थोडेसे पाणी सुद्धा टाकावे, गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून आपल्याला हवे तसे डोसे करावेत, त्या डोश्याला जाळी पडते,
- त्याच्याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणी करावी,
चटणीसाठी लागणारे साहित्य. :
- एक छोटी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे,
- सहा ते सात हिरव्या मिरच्या,
- एक लसणाची पाकळी,
- थोडीशी कोथिंबीर,
- तेल,
- जीरा,
- मोहरी,
- थोडसं भाजलेले शेंगदाणे,
- मीठ,
- थोडीशी साखर.
- खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमध्ये टाकावेत त्यात हिरवी मिरची लसणाची पाकळी थोडीशी साखर मीठ, शेंगदाणे हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे, त्यात कोथिंबीर टाकावी हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्यावे,
- नंतर ते एका भांड्यात काढून घ्यावे, एका छोट्या कढईत एक पळीभर तेल गरम करावे त्यात जिरं मोहरी टाकावे गॅस बंद केल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकावे,
- हि फोडणी आपण ज्या भांड्यात चटणी काढलेली आहेत्या चटणी मध्ये टाकावी, आपल्याला जशी पाहिजे तसे घट्ट पातळ करावी अशा रीतीने आपले खोबऱ्याची चटणी तयार आहे, .
तुम्हाला वाटेल पाव डोसा म्हणजे पावाचा संबंध येईल, पण तसं काही नाही पाव डोसा म्हणजे पावा सारखी जाळी त्या डोशाला येते,



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा