चण्याच्या डाळीच्या पिठाचे चविष्ट भेंडके…
साहित्य,
- चणाडाळ दोन वाट्या
- तूर डाळ एक वाटी
- दोन मध्यम आकाराचे कांदे
- आलं लसून
- हिरवी मिरची पाच ते सहा
- धने पावडर एक चमचा
- अर्धा चमचा हळद पावडर
- थोडीशी कोथिंबीर
- पाणी
- मीठ
भेंडके तयार करण्याची कृती,
- प्रथम चणाडाळ आणि तूरडाळ पाच ते सहा तास भिजत घालावी
- नंतर त्या मधलं पाणी काढून टाकावे, मिक्सरमध्ये चणाडाळ व
- तूर डाळ वाटून घ्यावी त्यामध्ये पाणी टाकू नये, मिक्सरमध्ये आलं लसूण मिरची पेस्ट करून घ्यावी, दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यावेत, मोठ्या भांड्यात वाटलेली चणाडाळ तूर डाळ
- कापलेला कांदा, आले लसूण मिरची पेस्ट, एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करावे, त्यात थोडी कोथिंबीर सुद्धा कापून टाकावी,
- एक मोठं पातेलं घेऊन, त्यात त्यात थोडे पाणी टाकावे, त्यात
- स्टीलचे चाळण ठेवून त्यावर कॉटनचे एक फडकं ठेवावं,
- आपण जे कालवण तयार केले आहे, ते हातात घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावे व ते आपण चाळणीवर ठेवलेल्या कॉटनच्या कपड्यावर छोटे गोळे करून थोड्या अंतरावर चार ते पाच ठेवावेत, कॉटनच्या फडक्याने ते व्यवस्थित झाकून ठेवावेत, ते भांड गॅस वर ठेवून त्यावर झाकण ठेवावे, पॅकबंद झाकण असावे, मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिट ते वाफवून घ्यावे,
- नंतर ते शिजल्यानंतर ते गॅस वरून काढून घ्यावे,
अशाप्रकारे आपले भेंडके खाण्यासाठी तयार आहेत, ते डिश मध्ये घेताना ते मोडून त्यावर तेल घालावं, व त्याबरोबर ताकाची कढी खायला द्यावी, हे खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा,


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा