- प्रथम एका भांड्यात चिरलेली कोथिंबीर घ्यावी त्यात बेसन पिठ तांदळाचे पिठ टाकावे, त्यात आलं-लसूण पेस्ट तिखट हळद धने पूड चवीनुसार मीठ टाकावे, सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे त्यात थोडे पाणी टाकावे
- सगळे मिक्स करून एक गोळा बनवावा, थोडा सैलसर बनवावा (म्हणजेच कणकेच्या गोळ्या पेक्षा नरम असावा),
- एक छोटी स्टीलची ताटली घ्यावी, त्याला तेल लावावे, त्यामध्ये ते सारण टाकावे. हाताने सारखे करून घ्यावे नंतर ते पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्यावे (कुकर मध्ये वाफवून घेतले तरी चालेल).
- गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. नंतर गॅसवर कढई ठेवून त् त्यात तेल टाकून गरम झाल्यावर त्या वड्या तळून घ्याव्यात किंवा तुम्हाला आवडत असतील तर नुसत्या फ्राय केल्या तरी चालतात.
अशा रीतीने खुसखुशीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा