पोपटी मिरचीचे लोणचे...
बाजारातून आणलेल्या ताज्या त्याच्या पोटी मिरच्यांचे लोणचे खूपच छान लागते. पावसाळ्यात गरम-गरम साधा वरण भात आणि तोंडी लावायला पोपटी मिरचीचे लोणचे. एकदम स्वादिष्ट लागते!
साहित्य:-
- पाव किलो हिरव्या पोपटी मिरच्या,
- 50 ग्रॅम मोहरी डाळ,
- एक मध्यम वाटी भरून लिंबू रस,
- एक टीस्पून मेथीदाणे,
- हिंग,
- तेल,
- हळद,
- चवीनुसार मीठ, इत्यादी.
कृती:-
सर्वप्रथम पोपटी मिरच्या चांगल्या धुऊन घ्याव्यात धूम झाल्यावर त्या थोड्या सुख द्याव्या.
सुकल्यानंतर त्यांचे एक इंचा एवढे तुकडे कापून घ्यावे.
तव्यावर किंचितसे तेल घालावे त्यात मेथी दाणे घालून भाजून घ्यावेत.
आता मिक्सरमध्ये भाजलेल्या मीठ द्या व थोडीशी मोहरी डाळ वाटून घ्यावी.
दोन वाट्या तेल कढईत गरम करून घ्यावे व ते कोमट होऊ द्यावे त्यानंतर त्यामध्ये हळद आणि दोन चमचे हिंग घालावे.
आता एका मोठ्या भांड्यामध्ये मिरचीचे तुकडे घ्यावे त्यात मिक्सरमध्ये केलेले वाटण घालावे व उरलेली मोहरीची डाळ घालावी.
त्यात एक वाटी लिंबाचा व चवीनुसार मीठ घालावे त्याच्यामध्ये कढईतले थोडेसे तेल घालावे व मिश्रण एकत्रित करावे.
एक स्वच्छ अशी काचेची किंवा प्लॅस्टिकची बळी घ्यावी त्यात हे मिश्रण घालावे व उरलेले सर्व तेल त्यात ओतावे.
अशाप्रकारे मिरचीचे लोणचे तयार आहे...
*टीप
जर तील कमी पडत असेल तर अजून तेल गरम करून गार करून त्यात टाकावे.
मिरचीचे लोणचे लगेच खाल्ले तरी चालते!


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा