सर्वाना आवडेल अशी फ्रँकी !
फ्रांकी साठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे,
(४-५ मोठ्या फ्रँकी साठी)
१. कोबी पाव किलो,
२. बटाटे मीडियम साईज ६ ते ७,
३. मध्यम आकाराचे २ कांदे,
४. 1 बीट,
५. चीज,
६. आले लसूण मिरची पेस्ट,
७. कणीक एक वाटी,
८. एक वाटी मैदा,
९. मीठ,
१०. पाणी,
११. टोमॅटो सॉस,
१२. थोडीशी मिरपूड.
कृती,
प्रथम फ्रांकी साठी लागणारी पोळी तयार करून घेऊ...
- एक वाटी कणीक आणि एक वाटी मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून ते मळून घ्यावे मळलेल्या पिठा ला हातावर थोडे तेल घेऊन परत व्यवस्थित मळून घ्यावे व ते मुरत ठेवावे अर्धा तास तरी ठेवावे.
- नंतर त्याचे छोटे छोटे चार-पाच करून पिठावर पोळी जातो त्याप्रमाणे लाटावेत तवा गरम करून, त्या पोळ्या अर्धवट कचकट शेकून घ्यावेत, त्या झाकून ठेवाव्यात.
फ्रांकी साठी लागणारे सारण तयार करून घेऊ...
- बटाटे कुकरमध्ये वाफवून घ्यावेत, त्याची सालं काढून ते स्मॅश करून घ्यावे.
- गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंस तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसूण-मिरची पेस्ट टाकावी. थोडीशी हळद,धने पूड, गरम मसाला टाकावा.
- नंतर त्यात स्मॅश केलेले बटाटे टाकावे आणि मीठ टाकावं, सगळे एकत्र करून घ्यावे! कोथिंबीर टाकावी आणि एक वाफ येऊ द्यावी.
- गार झाले की त्याचे लांबट असे अंडाकृती टिक्क्या कराव्यात (जेवढ्या पोळ्या तेवढ्या टिक्या कराव्यात.) व एका प्लेट मध्ये काढून ठेवाव्यात.
- गॅसवर कढई ठेवून अगदी किंचीतस तेल टाकावं, त्यात थोडं आले लसूण पेस्ट टाकावी. त्यात चिरलेला कोबी, चिरलेला कांदा, किसलेला बीट टाकून परतून घ्यावा. त्याला एक वाफ येऊन द्यावी त्यात थोडंसं मीठ टाकावं थोडासा कोबी शिजला की लगेच बंद करून टाकावे...
- हे सगळं मिश्रण फ्रांकी मध्ये घालण्यासाठी तयार करून ठेवावे,
आता प्रत्यक्ष फ्रांकी बनवायला सुरुवात करुया,
- प्रथम एक तवा घेऊन तो गरम करावा त्यावर थोडेसे बटर टाकून, आता अर्धवट शिजवलेल्या पोळ्यापैकी एक पोळी घेऊन ती तव्यावर शेकून घ्यावी
- त्या पोळीवर, बनवलेली टिक्की ठेवावी व पसरवून घ्यावी. त्यावर कोबी, कांदा, बीटचे, सारण एक सामान पसरावे.
- आता पोळी रोल करावी. एका बाजूने दुमडून दुसरी बाजू तिच्यावर दुमडावी. जेणे करून सारण पोलच्या आत मध्ये राहील.
- हे झाल्यावर पोळी चा रोल (फ्रँकी) पूर्णपणे शिजवून घ्यावा.
आता आपले फ्रॅन्की खायला तयार आहे! फ्रॅन्की ही गरम गरमच खावी. बनवायला थोडे जास्त कष्ट लागतात, पण तिची चव सगळयांना खुश करते!



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा