सुरणाचे कटलेट
१). सुरण पाव किलो
२) मध्यम आकाराचे एक बीट
३). तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे
४) एक पोळी (चपाती)
५) आलं लसूण मिरची पेस्ट
६). लिंबू
७). मीठ
८). गरम मसाला
९). धने जिरे पावडर
१०) थोडीशी तांदळाची पिठी
११) तळण्यासाठी तेल
12) थोडीशी हळद
१३) एक छोटी वाटी जाड रवा
कृती :
प्रथम सुरण साफ करून घ्यायचं नंतर त्याचे छोटे छोटे बटाटा कापतो तसे काप करून घ्यावेत नंतर ते दोन-तीन पाण्याने धुऊन घ्यावेत त्याचप्रमाणे बीट पण साफ करून घ्यावे त्याचे पण बारीक बारीक तुकडे करावेत ते सुरणाच्या भांड्यामध्ये ठेवून ते भांडे कुकरमध्ये ठेवावे त्याच्यात अगदी किंचीत पाणी टाकाव कुकर मध्ये ठेवताना किंचित पाणी टाकावे त्या भांड्यावर झाकण ठेवावे त्याच कुकरमध्ये बटाटे पण वाफवायला ठेवावे. कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घ्याव्यात
सुरण व बटाटा गार झाला की स्मॅश करून घ्यावा पोळी पण बारीक करून घ्यावी हे सर्व एकत्र करावे तब्येत पण स्मार्ट करून. टाकावे हे सर्व एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मिक्स करावे त्यात आलं लसूण मिरची पेस्ट थोडा गरम मसाला धने जिरे पावडर हळद थोडास तिखट हे सगळे एकत्र करावे थोडीशी तांदळाची पिठी पण टाकावी म्हणजे सगळे एकजीव होईल त्याचा गोळा करावा आपल्याला आवडत असेल तर कोथिंबीर सुद्धा टाकले तरीसुद्धा चालते चवीनुसार मीठ टाकून सगळे एकत्र करावे त्याचा घट्टसर गोळा तयार झाला की त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला हव्या त् आकारात कटलेट तयार करून एका ताटात ठेवावेत व दुसऱ्य एका छोट्या डिश मध्ये जाड रवा घेऊन त्यामध्ये ते घोलावेत कढईमध्ये तेल तापत ठेवून ते डीप फ्राय करून घ्यावेत किंवा आपल्याला आवडेल तर शालो फ्राय केले तरी सुद्धा चालतात अशाप्रकारे आपले गरमागर. सुरणाचे कटलेट तयार खाण्यासाठी त्याच्याबरोबर श्वास घ्यावा खूप चविष्ट होतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत तुम्ही नक्कीच जरूर करून बघा तुम्हाला ते नक्कीच आवडतील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा