वर्षभर टिकणारा बटाट्याचा कीस ! उपासाला चालेल असा...
उन्हाळ्यात बटाटे खूप स्वस्त असतात. तेवढे चांगले बटाटे वर्षभर मिळतीलच असा नाही त्यामुळेच ,
मी चांगला वर्षभर टिकणारा असा बटाट्याचा (उपासाला चालेल असा कीस) मस्त तयार करून हवाबंद डबे मध्ये भरून ठेवते! तो हवाबंद डब्यत चांगला राहतो.
किसासाठी लागणारे साहित्य: -
- ४-५ किलो चांगले मोठे बटाटे (शक्यतो चिकट आणि स्टार्च नसलेला बटाटा वापरावा त्याने किस छान पिवळा येतो आणि तळल्यानंतर लाल होत नाही),
- चवीनुसार खायचं मीठ (उपवासासाठी काढून ठेवलेलं),
- पाणी,
- बटाटे खिसायची किसणी, इत्यादी.
किसबनवणायची कृती: -
- प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत,
- कुकर मध्ये टाकावेत त्यात थोडे पाणी टाकावे चवीनुसार मीठ घालावे,
- कुकराच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. महत्वाचे म्हणजे बटाटे थोडे कचवट शिजवावेत.
- गार झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यावीत,
- प्लॅस्टिक कागद जमिनीवर पसरून घ्यावा, (प्लास्टिकचा plain कागद वापरावा. बिलबोर्ड किंवा ताडपत्रीचा कागद वापरू नये. त्याचे प्लास्टिक किसाला चिकटण्याची शक्यता असते.)
- बटाटे किसायच्या किसणीने प्लास्टिकच्या कागदावर सुट्टा खीस टाकून घ्यावा (किसाच्या गाठी नकोत),
- घरात जेथे ऊन असेल तेथे घालावा; नाहीतर पंख्या खाली सुकवला तरी चालेल,
- खिस चांगला सुकला की तळून बघावा तो लगेच फुलला की समजावं किस सुकला आहे. तो एका प्लास्टिकचा एअर टाईट बरणी मध्ये भरून ठेवावा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो तळून खाता येतो.
हा किस खायला खूप छान लागतो; लहान मुलांना तर हा अतिशय आवडतो…


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा