कुरकुरीत आणि चमचमीत अश्या उपवासाच्या साबुदाणा-बटाटा स्टिक्स…

उपवासाला प्रत्येकांना काहीतरी चमचमीत खावेसे वाटते. त्यासाठी आपण अणे पदार्थ बनवतो त्यातील साबुदाणा चकली एक खास आवडीचा पदार्थ. पण सध्याच्या काळात जागेच्या अभावी चकल्या वाळत घालता येत नाही त्या साठी सोपा उपाय म्हणजे चकल्यांच्या ऐवजी स्टिकस घालणे. कारण त्या कमी जागेत आणि थोड्याश्या उन्हात वळून जातात.  

साहित्य: -

  1. बटाटे एक किलो,
  2. साबुदाणापाऊण किलो,
  3. मीठ,
  4. तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट,
  5. पाणी, इत्यादी. 

कृती: -

चकल्या ज्या दिवशी घालायच्या असतील त्याच्या आदल्या दिवशी,
  1. आपण खिचडीला कसा साबुदाणा भिजत घालतो त्या प्रकारे साबुदाणा धुऊन घ्यावा व किंचित पाणी टाकून तो साबुदाणा झाकून ठेवावा.  
  2. जेवढा साबुदाणा भिजवला आहे. तेवढेच भांडी पाणी मोठ्या पातेल्यात घेऊन त्या पाण्याला उकळी आणून द्यावी. त्या पाणयात थोडे मीठ घालावे, 
  3. भिजवलेला ज़ो साबुदाणा आहे, तो चमच्याने मोकळा करून घ्यावा. आणि उकळलेल्या पाण्यामधे टाकावा.  
  4. पाण्यामध्ये साबुदाणा एक सारखाकरून घ्यावा. गरम पाण्यात एक वाफ येऊ द्यावी व गार झाले की त्याच्यावर झाकण ठेवावे. 
दुसऱ्या दिवशी सकाळी 
  1. बटाटे कुकरमध्ये वाफवून घ्यावेत.  (बटाटे वाफवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकावे म्हणजे त्याची साले निघून येत नाहीत व बटाटे चांगले शिजतात.) 
  2. बटाटे गार झाले की त्याची साले काढून घ्यावीत बटाटे स्मॅश करून घ्यावेत.  
  3. जसा साबुदाणा भिजवलेला आहे त्यातच स्मॅश केलेले बटाटे टाकावे. 
  4. आपल्या आवडीनुसार त्यामध्ये तिखट किंवा मिरची पेस्ट टाकावी त्यात थोडे मीठ पण घालावे (साबुदाणा मध्ये मीठ असल्याने आपल्या अंदाजाने मीठ घालावे)
  5. सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे नंतर चकल्या/स्टिक कराव्यात. 
प्लास्टिकचा कागद पसरून त्यावर चकल्या घालाव्यात किंवा लांबच्या लांब स्टिक घालाव्यात घरात जर ऊन येत असेल तर त्याठिकाणी करावे नाहीतर पंख्याखाली चुकले तरी चालतात नंतर थोडेसे उन्हात  उन्हात ठेवून वाळवाव्यात व्यवस्थित सुकल्या की तेलामध्ये तळून बघाव्यात मस्त फुलतात तुम्हाला नक्कीच आवडतील जरूर करून बघा. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट