शुद्ध बेसनापासून बनलेले दिवाळीच्या फराळाती बेसन शेव
१००% शुद्ध बेसनापासून बनलेले दिवाळीच्या फराळाती बेसन शेव…
साहित्य :-
- पाव किलो बेसन,
- दोन ते तीन चमचे तिखट,
- एक टीस्पून पापड खार,
- हळद,
- ओवा,
- मिरपूड,
- मीठ,
- पाणी,
- तेल तळण्यासाठी, इत्यादी.
कृती :-
- ओव्याची बारीक पूड करून घ्यावी.
- एका मोठ्या वाडग्यात मध्ये पाव किलो बेसन घेऊन त्यामध्ये ओवा पूड मीरपूड, थोडीशी हळद, तिखट दोन ते तीन चमचे, आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी चालते.
- एका पातेल्यात थोडे पाणी घेऊन, त्यात एक चमचा पापड खार टाकून ते पाणी उकळून घ्यावे ते गार झाले की ते पाणी त्या पिठामध्ये घालावे.
- एकजीव करुन घ्यावे त्यात चवीनुसार थोडेसे मीठ पण टाकावे त्या पाण्यात मावेल एवढे पीठ भिजवावे. थोडा घट्टसर गोळा करून घ्यावा .
- गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये तेल टाकावे शेव करायच्या समस्यांमध्ये पिठाचा गोळा टाकावा.
- तेल गरम झाले असेल तर साच्या ने कढईत शेव पाडून घ्यावी, लगेच झाल्याने पलटी करावे म्हणजे ते करपत नाही.
- अशाप्रकारे बेसनाचे शेव तयार करून घ्यावेत.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा