लाल बीटाचे चविष्ट आणि पौष्टिक पराठे
![]() |
| लाल बीटाचे पराठे |
मुलं बिट खायला तयार नसतात त्यामुळे असा पराठा करून दिला कि ते आवडीने खातात !!!
साहित्य :-
1. एक मध्यम आकाराचे बीट
2. एक बटाटा
3. आले लसूण मिरची पेस्ट
4. गव्हाचं पीठ दोन वाट्या
5. बेसन पीठ एक वाटी
6. तिखट सवयीनुसार
7. मीठ,
8 छोटा अर्धा चमचा हळद
9. पाणी
कृती :-
- प्रथम बीट आणि बटाटा वाफवून घ्यावे, गार झाल्यावर बीटाच छोटे तुकडे करून मिक्सर मधून काढून घ्यावेत.
- उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यावा. बीट आणि बटाटा एकत्र करून घ्यावेत.
- त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, तिखट, चवीनुसार मीठ, धने-जिरे पावडर, बारकी दळलेले गव्हाचे पीठ व डाळीचे पीठ टाकून एकत्र मळून घ्यावे (लागला तर थोडं पाणी टाकावं)
- एकदम मऊसर पीठ मळून घ्यावे थोड्यावेळ मुरत ठेवावे.
- नंतर त्याचे छोटे गोळे करून आपल्याला हवे तसे छोट्या आकाराचे मोठ्या करायचे पराठे लाटून तेलावर किंवा बटरवर शेकून घ्यावेत.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा