तिखट चमचमीत मुंबई पाव भाजी...
साहित्य. :-
- पाव किलो फ्लावर
- चार-पाच मध्यम आकाराचे बटाटे
- एक वाटी मटार
- एक सिमला मिरची
- एक छोटी वाटी बीटाचे तुकडे
- तीन ते चार टोमॅटो
- चार मध्यम आकाराचे कांदे
- आलं लसूण मिरची पेस्ट
- हळद, जिरे पावडर, गरम मसाला,
- लाल तिखट, रंगाच तिखट एक चमचा
- कोथिंबीर
- बटर
- पाणी
- थोडसं तेल
कृती. :-
- प्रथम फ्लॉवर साफ करून घ्यावा त्याचे छोटे तुकडे करून, ते मिठाच्या गरम पाण्यामध्ये दोन मिनिटं उकळून स्वच्छ धुऊन घ्यावे.
- कुकरा मध्ये फ्लॉवर बटाटा सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घालावेत त्यामध्ये बीटाचे तुकडे घालावेत फ्लॉवर सिमला मिरची बीटाचे तुकडे वटाणा सर्व एकाच भांड्यात टाकून वाफवून घ्यावे, बटाटा साईडला टाकून वाकून घ्यावा कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा केव्हा आवडत असेल तर मिक्सर मधून बारीक करून घ्यावा कुकर गार झाला की
फ्लावर मटार सिमला मिरची हे सगळंच मॅश करुन घ्यावा
वाफवलेले बटाटे सोलून घ्यावे व ते पण स्मॅश करावेत गॅस वर
कढई तापत ठेवावी त्यात थोडेसे तेल टाकावे तेल तापल्यावर त्यात थोडं कलर्स तिखट टाका व कांदा आणि टोमॅटो पेस्ट केलेली आहे ती टाकावी त्यात आले लसण मिरची पेस्ट
गरम मसाला धने जिरे पावडर तिखट हळद टाकून थोडा वेळ शिजू द्यावे नंतर त्यामध्ये फ्लॉवर बटाटा त्याची पेस्ट करून ठेवलेला आहे ती त्यामध् घालावी ते सर्व ढवळून एक सारखा करून घ्यावं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालावं त्यात चवी नुसार मीठ घालावं चांगली वाफ आणावी दहा पंधरा मिनिटात घरी शिजू द्यावे, अशाप्रकारे आपली पावभाजी तयार आहे
पावभाजी सर्व करताना प्लेटमध्ये पावभाजी टाकल्यावर त्यावर बारीक चिरून कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बटर चा एक छोटा तुकडा टाकावा लिंबाची फोड द्यावी गरम करून घ्यावे बटरवर
चमचमीत पावभाजी खायला तयार आहे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा