कारल्याची भाजी !

कारल्याची भाजी सहसा कोणाला आवडत नाही  पण ती औषधी असते म्हणून महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा खावी.


साहित्य. :-

  १. (250gm) पाव किलो. कारली
  २.  तिखट
  ३.  मीठ
  ४.  धने पावडर एक चमचा
  ५.  हळद
  ६.  जिरे मोहरी
  ७.  तेल
  ८.  पाच-सहा लसणाच्या पाकळ्या

कृती. :-

  • प्रथम कारली व्यवस्थित धुऊन पुसून सुकून घ्यावी, नंतर कारल्याचे गोल चकत्या कापून घ्याव्यात किंवा आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे चौकोनी कसे पण तुकडे करून कापली तरी चालेल. 
  • एका भांड्यात कापलेल्या काचर्‍या ठेवून त्यावर एक दोन चमचे मीठ टाकावे व दोन-तीन तास झाकून ठेवावे त्यानंतर त्याला पाणी सुटते ते पाणी काचऱ्या मुठीने पिळून काढून घावे नंतर स्वच्छ पाण्याने कारले धुऊन घ्यावीत ती पण पिळून काढावेत पाण्याचा अंश ठेवू नये. (या मुळे कारल्याचा कडवट पण जातो) 
  • गॅसवर कढई गरम करत ठेवावी लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊन त्याचे बारीक तुकडे करावेत कढईमधे थोडे तेल टाकावे तेल तापले की त्यात जिरे, मोहरी लसुन टाकावा त्यात कारल्याच्या चकत्या टाकाव्यात एक चमचा हळद, एक चमचा धने जिरे पावडर टाकावी थोडंसं मीठ टाकावं आणि अजून थोडंसं तेल सोडून झाकून  ठेवावे. पाच मिनिटांनी झाकण काढून भाजी हलवून घ्यावी त्यात आपल्या आवडीप्रमाणे तिखट एक ते दोन चमचे टाकावे आणि परत पाहिजे असेल तर थोडंसं तेल टाकून परत झाकण ठेवावे. 
  • ही भाजी व्हायला थोडा वेळ लागतो कारण गॅस मंद आचेवरच ही भाजी करावी. मोठा गॅस वर ही भाजी करपून जाते. थोड्या थोड्या वेळाने भाजी हलवत रहावी, २० ते २५ मिनिटात ही भाजी तयार होते.  (आपल्याला आवडत असल्यास ही भाजी कुरकुरीत सुद्धा करता येऊ शकते ते थोडी जास्त वेळ अजून शिजवावेत)
        अशाप्रकारे आपले कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल !


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट