मुख्य सामग्रीवर वगळा
मेथीची भाकरी
मेथीची भाकरी म्हणजे सुक्या पिवळ्या कलरच्या मेथ्या मिळतात मिळतात त्या पिठाची भाकरी बनवणे,. हे वागणे काढतांना अजिबात कडू लागत नाही , मेथ्या गुणकारी आहेत, आपण थंडीत मेथीचे लाडू करून खातो त्याप्रमाणे हे भाकरी सुद्धा खावी !
साहित्य :-
- मेथीचे पीठ एक चमचा
- ज्वारीचे पीठ एक मोठी वाटी
- गव्हाचं पीठ दोन चमचे
- पाणी
- मीठ, हळद
कृती :-
- प्रथम मेथीचे एक चमचा पिठी घ्यावे त्यात ज्वारीचे पीठ एक मोठी वाटी, गव्हाचे दोन चमचे पीठ घ्यावे चवी नुसार मीठ टाकावे, यामध्ये किंचित हळद टाकावी.
- ही सर्व पीठे एका परातीत मिक्स करून घ्यावे त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकावे, कणकेपेक्षा थोडा. सैल गोळा करावा नंतर त्या गोळ्याला ज्वारीचा सुख पीठ लावून भाकरी थापावी.
- परातीत भाकरी करताना खाली ज्वारीचं सुख पीठ टाकावे त्यावर भाकरी थापून घ्यावे.
- गॅसवर तवा तापत ठेवावा तवा तापला की त्यावर भाकरी टाकावी, आता थोडे पाणी घेऊन भाकरीवर हाताने पसरून घ्यावे. म्हणजे भाकरीला पोपडा सुटतो, भाकरी चांगली मोठ्या गॅस वर ऐकून घ्यावे नंतर पलटी करून घ्यावी,
- दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून झाल्यावर तवा खाली उतरून घ्यावा आणि भाकरी गॅसवर शेकून घ्यावी,. त्याप्रमाणे आपण फुलके करतो. ज्याप्रमाणे भाकरी शेकून. घ्यावी.
- अशाप्रकारे मेथीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे, या भाकरी बरोबर आपल्याला
नुस्त्याची खायला खूपच चांगले लागते ते आंबट गोड असते,
किंवा शेंगदाण्याची चटणी. बरोबर खाल्ली तरीसुद्धा चालते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही चटणी करू शकतात, हे भाकरी तुम्हाला खूप आवडेल तुम्ही एकदा तरी करूनच बघा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा