मुख्य सामग्रीवर वगळा
ओल्या नारळाची चटणी !
साहित्य :- (3-4 जणांसाठी)
- ओल्या नारळाची अर्धी वाटी,
- ५-६ हिरव्या मिरच्या,
- एक लसणाची पाकळी,
- एक मूठ भर शेंगदाणे,
- मीठ,
- थोडीशी कोथिंबीर,
- पाणी,
- एक चमचा साखर,
- जिर,
- मोहरी फोडणीसाठी.
- थोडसं तेल,
- थोडीशी हळद, इत्यादी.
कृती :-
- नारळाची जी अर्धी वाटी आहे ती प्रथम खवळून घ्यावी नाहीतर त्या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे.
- मिरच्या तव्यावर थोड्याशा भाजून घ्याव्यात त्याच बरोबर शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यावेत,
- खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे हिरवी मिरची लसणाची एक पाकळी थोडीशी साखर चवीनुसार मीठ हे सर्व सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यावे थोडासा कडीपत्ता असल्यास तोही टाकावा त्यामुळे त्याला वेगळी टेस्ट येते नंतर कोथिंबीर सुद्धा त्यामध्ये टाकावी पाणी टाकून मस्त बारीक चटणी वाटून घ्यावी चटणी एका एका भांड्यामध्ये काढून घ्यावी,छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवावे तेल तापले की त्यात जिरे मोहरी टाकावी गॅस बंद करावा नंतर त्या. फोडणीमध्ये थोडीशी हळद टाकावी तो लगेच कढईतली फोडणी चटणी वर गरम गरम टाकावी चटणी च्या कलर मध्ये बदल होतो आणि चव सुद्धा चांगली लागते आपल्या
आवडीनुसार चटणी. मध्ये पाणी कमी-जास्त टाकावे, झाली आपली चटणी खाण्यासाठी तयार नक्की करून बघा,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा