कळण्याची भाकरी

कळण्याची भाकरी म्हणजे काय असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल, कळणा म्हणजे अख्खे उडीद सालीसकट
दळून आणलेल्या पिठाला कळणा म्हणतात. यामध्ये भरपूर प्रोटिन्स असतात आणि खायलाही चवदार लागते तुम्ही एकदा करुन तर बघा तुम्हाला नक्की आवडेल, या भाकरी बरोबर निसत्यची चटणी आणि शेंगदाणा चटणी मस्त लागते. 


साहित्य :-

  1. कळण्याचे पीठ दोन चमचे,
  2. ज्वारीचे पीठ एक मोठी वाटी,
  3. मीठ,
  4. पाणी. 

कृती :-

  • प्रथम एक मोठ्या आकाराचे  खोलगट. थाळी किंवा परात घ्यावी त्यामध्ये. एक मोठी वाटी ज्वारीचे पीठ घ्यावे त्यामध्ये दोन चमचे कळण्याचे पीठ टाकावं चवीनुसार मीठ टाकावं. 
  • पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे, ज्याप्रमाणे आपण कणकेचा गोळा करतो त्यापेक्षा थोडा. सईल मळावा तू व्यवस्थित कुस्करून घ्यावा त्या पिठाचा गोळा बनवून घ्यावा आणि त्याला दोन्ही साईडला  ज्वारीच्या  सुक्या पिठात घोळून द्यावा प्रथम हातावर थोडीशी भाकरी ची सुरुवात करून घ्या नंतर थाळीमध्ये किंवा परातीत ज्वारीचे पीठ टाकून त्यावर भाकरी थापून घ्यावे मध्यम आकाराची थापावे तवा गरम करत ठेवावा गॅस वर तवा तापल्यावर त्यावर भाकरी टाकावी आणि वरून थोडसं पाणी फिरायचं म्हणजे त्याला पोपडा  सुटतो, थोड्यावेळानी  भाकरी पलटी करून घ्यावी ते चांगले चारी बाजूशेशेकुन  द्यावी नंतर गॅस वरून तवा काढून घ्यावा आणि भाकरी त्या स्वर शेकून घ्यावी तेव्हा  त्या भाकरी ला पोपडा सुटतो

अशा रीतीने आपली कळण्याची भाकरी खाण्यासाठी तयार झाली आहे एकदा नक्की करून बघा गरम गरम भाकरी त्याच्या बरोबर चटणी किंवा ठेचा खावा मस्त लागते
हे प्रमाण एका भाकरीसाठी लिहून दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्हाला जे करायचे असेल ते सप्रमाण घ्यावं.



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट