नरमगरम कुरकुरीत गोल अप्पे...

साहित्य :-

  •   १. दोन वाट्या तांदूळ
  •   २. एक वाटी उडदाची डाळ
  •   ३. चिमूटभर खायचा सोडा
  •   ४. तेल
  •   ४. मीठ
  •   ५. पाणी
  •   ६. आप्पे करण्याचा तवा

कृती :-

  • सकाळी दोन वाट्या तांदूळ धून पाण्यात भिजत घालावे, तसेच उडीद डाळ दोन वेळा पाण्याने धुऊन घेउन ती पण भिजत घालावी.  
  • संध्याकाळी तांदूळ आणि उडीद मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्यावे. रात्रभर झाकून ठेवावे दुसऱ्या दिवशी पीठ फुगून वरती येते, 
  • त्यामध्ये चवी नुसार मीठ, चिमुटभर खायचा सोडा टाकून पीठ एकजीव करावे व पीठ फेसून घ्यावे,
  • अप्पे करायचा तवा मंद आचेवर तापत ठेवावा, तवा तापला की प्रत्येक अप्याच्या साच्यात थोडे तेल टाकून नंतर खोलगट चमच्याने आपण तयार केलेले मिश्रण घालावे. 
  • मिश्रण घालून झाल्यावर त्यावर परत चमच्याने तेल थोडे थोडे सोडावे. झाकण ठेवून चार मिनिटांनी उघडून बघावं आपले अप्पे तयार होत आलेले असतील. 
  • तेव्हा चमच्याने त्यांना पलटी करून घ्यावे व दोन-चार मिनिटे शिजू द्यावे,
  • अशा रीतीने आपले अप्पे मस्त कुरकुरीत मस्त ब्राऊन कलर चे झाले की काढून घ्यावे, 
  • सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम गरम आप्पे तयार त्याबरोबर चटणी द्यावी. 
अप्पे खोबऱ्याच्या चटणी सोबत 

असे अप्पे लहान मुलांना खूपच आवडतात त्याच बरोबरीने ते पौस्टिक हि असतात. तवा तापला की पटापट होतात वेळ लागत नाही सगळ्यांच्याच नाश्त्याचा प्रश्न त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा!
अप्प्यांचा तवा त्यामध्ये अप्पे करताना. 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट