साजूक तुपातले रव्याचे लाडू...
4 वाट्या बारीक रवा,
3 वाट्या साखर,
1 नारळ,
7 ते 8 वेलदोडे,
बेदाणे,
1 वाटी साजूक तूप, इत्यादी.
कृती:-
सर्वप्रथम जाड जाड बुडाच्या कढईत एक वाटी तूप घ्यावे व त्यात रवा घालून चांगला भाजून घ्यावा.
रवा भाजत आला की त्यात खोवलेला नारळ घालावा आणि परतवून घ्यावा.
एका पातेल्यात तीन वाट्या साखर घ्यावी व त्यात एक वाटी पाणी घालावे पातेले गॅसवर ठेवावे व चांगले एकजीव करावे
एक उकळी आली की पातेले खाली उतरवून ठेवावे त्यात थोडीशी वेलदोड्याची पूड घालावी.
आपक भाजून घेतलेल्या रव्यामध्ये टाकावा हाताला सोसेल इतपत गरम झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्यावेत.
रव्याचे लाडू तयार आहेत...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा