चमचमीत, झणझणित मिसळ!

साहित्य  :-

  • १ वाटी मोड आलेले मटकी,
  • ३ - ४ मध्यम आकाराचे कांदे,
  • अर्धी वाटी सुका खोबर किस, 
  • २ - ३ लाल टोमॅटो, 
  • १ छोटा चमचा गरम मसाला,
  • २ छोटा चमचे धने जिरे पूड.
  • ५ - ६ हिरव्या मिरच्या,
  • चवीनुसार हळद,
  • चवीनुसार आलं लसूण पेस्ट,
  • बेडगी मिरचीचे तिखट (मिसळला चांगला रंग येण्यासाठी), 
  • लवंगी मिरचीचे तिखट (झणझणित मिसळ बनव्यासाठी),
  • तेल,
  • पाणी,
  • १ स्टेपून तांदूळ,
  • १ छोटा चमचा साखर,
  • मिसळीवर घेण्यासाठी  - कांदा कापलेला, थोडी कोथिंबीर, १ लिंबू, १/२ किलो फरसाण.  

कृती :-

  • सर्वप्रथम कांदा बारीक कापून घ्यावा, टोमॅटो चिरून घ्यावे,
  • गॅसवर तवा गरम करावा, त्यावर प्रथम खोबरं, हिरव्या मिरच्या भाजून घ्याव्यात त्यानंतर १ चमचा तांदूळ घेतलेले भाजून घ्यावेत,
  • कांदा तव्यावर टाकून तो व्यवस्थित ब्राऊन होईस्तोवर भाजून घ्यावा. त्यात थोडं तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित भाजला जातो.  
  • हे सर्व मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यावे वाटतानाच त्यामध्ये थोडीशी हळद पण  टाकावी, त्यातच आलं लसूण पेस्ट टाकावी, एकदम  वाटण सगळं वाटलं जात नसेल तर दोनदा करावं आणि पातेल्यात काढून ठेवावं,
  • मोड आलेली मटकी कुकरमध्ये १ - २ शिट्टी मध्ये वाफवून घ्यावी. जर तुम्हाला मटकी नको असेल तर तुम्ही वाटाणा हि वापरू शकतात  ( कडधान्य आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतात )
  • गॅसवर कढई गरम करत, त्यामध्ये दोन डाव तेल टाकावे  (यामध्ये तेल थोडं जास्त लागतं, तेव्हा चांगली तरी येते.)  
  • गॅस मंद आचेवर ठेवावा. तेल तापलं की त्यात १ छोटा चमचा साखर, १ चमचा तिखट टाकावं (चवीनुसार).  त्याच लगेच आपण बनवलेलं वाटण आहे ते पण टाकावे आणि अजून १ चमचा तिखट टाकावे आणि रंगाचे तिखट आहे ते पण १ चमचा टाकून घ्यावे. 
  • गरम मसाला, धने जिरे पूड, सगळं टाका व त्यात झाकण ठेवून ते चांगले शिजवून द्यावं. त्याला तेल सुटेस्तोवर मध्ये मध्ये हलवत राहावं, 
  • एका पातेल्यात गरम पाणी करावे, 
  • खडकला व्यवस्थित शिजलं की त्याला तेल सुटतं ते सुटलं की त्यामध्ये गरम पाणी टाकावे आणि आपण वाफवलेल्या मटकी टाकून घ्यावी. आपल्याला जेवढी मिसळ पातळ हवीय त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करावे. चवीपुरती मीठ टाकावे.   
  • मिसळवर मस्त तरी येते आणि थोडी उकळी आली की गॅस बंद करावा. 
आपली गरमागरम मिसळ खाण्यासाठी तयार आहे, त्यावर फरसाण, कांदा कापून टाकावा थोडी कोथिंबीर लिंबू  घ्यावं आपली झणझणीत मिसळ खाण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल. 
हे प्रमाण तीन ते चार माणसांसाठी व्यवस्थित पुरते, जास्त जणांचा करायचा असेल तर प्रमाण वाढवावे, 



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट