मुळ्याच्या पानाचा पराठा...
| मुळ्याचा पराठा सर्व्हिंग |
साहित्य :- ३ जणांसाठी
- मुळ्याची पान एक मोठी वाटी चिरलेली,
- छोटा बटाटा एक,
- पाणी,
- आलं लसूण मिरची पेस्ट,
- हळद,
- एक छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर,
- मीठ,
- गव्हाचं पीठ,
- बेसन पीठ,
- तेल.
कृती :-
- प्रथम कुकरमध्ये मुळ्याची पाने व बटाटा वाफवून घेणे,
- गार झाले की मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवावी.
- जर आपल्याला आवडत असेल तर मिक्सरमध्ये कोथिंबीर पण वाटून घ्यावी किंवा बारीक चिरून जरी टाकली तरी चालते.
- त्यामध्ये बटाटा पण कूचकरून टाकावा.
- दोन वाट्या कणीक घ्यावी, एक छोटी वाटी बेसन पीठ घ्यावे. त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ टाकावे.
- हे मिश्रण एकत्र करून घ्यावे. घट्ट पोळीला कणिक मिळतो तसा गोळा करून घ्यावा आपल्याला वाटल्यास त्याच्यात थोडसं पाणी टाकावे.
- गॅसवर तवा तापवावा. पोळपाट लाटणे घेऊन त्या गोळ्याचे छोटे उंडे करावेत.
- आपल्याला हवे तसे पराठे लाटावे आणि ते तेलावर खरपूस शेकून घ्यावे.
मुलांना आणि मोठयांना दोघांना खूप आवडतात.
गरम गरम पटापट खाल्ले पण जातात.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा