मुख्य सामग्रीवर वगळा
पातळ पोह्यांचे दडपे पोहे.
साहित्य. :
- पातळ पोहे पाव किलो,
- मध्यम आकाराचे २ ते ३ टोमॅटो,
- अर्धी वाटी ओलं खोबरं
- मध्यम आकाराचे २ कांदे
- एक लिंबू
- ५ - ६ हिरवी मिरची
- कडी पता,
- कोथिंबीर,
- एक चमचाभर साखर,
- जिरे,
- मोहरी,
- एक चमचा धणे पूड,
- फोडणीसाठी थोडं तेल,
- मीठ.
कृती. :
- प्रथम पोहे चाळून घ्यावेत, नंतर एका भांड्यात टाकावे.
- त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावेत व हलवून घ्यावे आणि किंचित पाणी शिंपडावे आणि झाकण ठेवून दहा-पंधरा मिनिटे ठेवावे. टोमॅटोच्या रसामध्ये ते पोहे चांगले मुरतात.
- कोथिंबीर चांगली धुऊन घ्यावी सुकल्यानंतर बारीक चिरून ठेवावी.
- नारळ खावून घ्यावे किंवा किसून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरचीचे तुकडे करून घ्यावेत, लिंबूचा रस एका वाटीत काढून घ्यावा, तो रस त्या पोह्यांमध्ये टाकून घ्यावा.
- आणि पोहे परत एकदा हलवून घ्यावेत ते सुके आहेत असे वाटले तर किंचित पाणी परत शिंपडावं,
- गॅसवर कढई गरम करत ठेवावे. फोडणीपुरते तेल टाकावे तेल तापलं की त्यात जिरे मोहरी हळद थोडेसे शेंगदाणे कांदा बारीक चिरलेला हे सगळ टाकून घ्यावे तसेच मिरचीचे तुकडे , कढीपत्ता हे पण फोडणीत टाकावे
- आपल्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी अधिक करावे, त्यात एक चमचा साखर घालावी आणि कांदा शिजवून घ्यावा.
- कांदा शिजून झाला की गॅस बंद करावा त्या कढईमध्ये पातेल्यातले पोहे टाकून घ्यावे चवीनुसार मीठ टाकावे आणि हलवावे , त्यामध्ये खवलेला नारळ कोथिंबीर टाकून परत एकदा हलवून झाकण ठेवावे अशा रीतीने आपले दडपे पोहे खाण्यासाठी तयार झालेत ,
आंबट आणि मध्येच गोड असे मस्त चव येते हे खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा जरूर करून बघा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा