चटपटीत खारे शंकरपाळे

चहा बरोबर खाण्यासाठी चटपटीत कुरकुरीत असे खारे शंकरपाळे कधीही खायला  आवडती तुम्ही एकदा तरी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील

साहित्य : -

1. मैदा पाव किलो,
2. बारीक रवा एक छोटी वाटी,
3. दोन चमचे ओवा,
4. सात-आठ मिरे,
5. एक चमचा जिरा,
6. चवीनुसार मीठ,
7. पाणी,
8. तूप,
9. तळण्यासाठी तेल.

कृती : -

  1. एका भांड्यात मैदा घेऊन त्यात रवा टाकावा. आपल्या आवडीनुसार मीठ टाकावे (साधारण दोन छोटे चमचे) त्यात एक चमचा तूप टाकावे,
  2. ओवा, जिरे आणि मिरे थोडेसे कुटून घ्यावेत आणि ते त्या पिठात टाकावे हे सर्व मिक्स करून घ्यावे. 
  3. नंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकावे आणि पिठाचा घट्ट गोळा भिजवून घ्यावा, पीठ घट्ट भिजवावे सैल भिजवू नये. घट्ट गोळ्याचे शंकरपाळे करण्यासाठी व्यवस्थित जमतात. 
  4. पिठाचे पोळी लाटता यईल एवढे गोळे करावे, नंतर पोळपाटावर लाटून घ्यावेत.  
  5. त्यानंतर त्याचे सुरीने आपल्या आवडीनुसार लहान मोठे काप करून घ्यावेत 
  6. असे सगळे काप करून एका ताटात ठेवावेत नंतर कढईत गरम करून त्यात तेल टाकावे आणि सगळे एकदम व्यवस्थित मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावेत. 
अशाप्रकारे आपले खुसखुशीत चटपटीत असे शंकरपाळे चहाबरोबर खाण्यासाठी तयार आहेत मुलांना डब्यात दिले तरी चालतील त्यांना खूप आवडते नक्की करून बघा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट