मूग डाळीचा वडा
साहित्य:-
1. मूगडाळ 2 वाट्या सालीसकट,
2. चणा डाळ अर्धी वाटी,
3. उडीद डाळ अर्धी वाटी,
4. हिरवी मिरची 5-6,
5. आले-लसूण पेस्ट,
7. जिर - बडीशेप - अक्खे धणे प्रत्येकी एक चमचा,
8. तिखट गरजे नुसार,
9. कोथिंबीर,
10 मध्यम आकाराचा एक कांदा,
11. तळण्यासाठी तेल,
कृती:-
- प्रथम मुग डाळ, चणाडाळ, उडीद डाळ या सर्व डाळी वेगवेगळ्या भांड्यात चार ते पाच तास भिजत घालाव्यात. नंतर त्या चाळणीत नितरत ठेवाव्यात म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल.
- कोथिंबीर धुऊन सुकत ठेवावी, कांदा बारीक चिरून घ्यावा, कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यावी.
- डाळींमधील पाणी निथळले की मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात, त्यामध्ये मिरची पण वाटून घ्यावी, त्यात बडिशेप धने जिर हे सर्व पण वाटून घ्यावे, मिश्रण थोडे जाडसर असेल तरी चालते पण तुम्हाला जर पाणी आवश्यक असेल तर अगदी किंचित टाकावं पण जास्त नाही. नाहीतर वडे नीट जमणार नाही.
- वाटून झालेले मिश्रण एका मोठ्या भांड्यात घ्यावे, त्यामध्ये आले-लसून पेस्ट, तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- वडे थापण्यासाठी दुधाच्या पिशवीचा एक प्लॅस्टिकचा कागद घ्यावा, त्या कागदाला थोडं पाणी लावावं, नंतर मिश्रणाचा छोटा गोळा करून घ्यावा. प्लास्टिकच्या कागदावर थापावा.
- गॅसवर कढई ठेवून तेल गरम करावे. तेल तापले की गॅस थोडा हळू करावा.
- थापलेला वडा हाताला थोडासा पाणी लावून तेलात सोडावा. दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यावा.
अशा पद्धतीने आपले सर्व वडे तळून घ्यावेत. मस्त खुसखुशीत असे मुगाच्या डाळीचे वडे खाण्यासाठी तयार, आपण त्या बरोबर चटणी घेऊ शकतात. नुसते खाल्ले तरी मस्त लागतात!
मुगाची डाळ पचायला पण हलकी असते आणि सालीसकट असल्यामुळे पोष्टिक पण होतो त्यामुळे नक्की करून बघा


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा