साधी फोडणीची खिचडी
संध्याकाळच्या जेवायला काय करावं हा नेहमीच प्रश्न पडतो, झटपट पण पोट भरून होईल असं काहीतरी करावं असं नेहमीच सगळ्या बायकांना वाटत असतं म्हणूनच हे सोपे रेसिपी फोडणीची खिचडी गरम गरम एकदम मस्त लागते तुम्ही नक्की करून पहा,
साहित्य. : दोन जणांसाठी
- तांदूळ एक वाटी,
- तुरीची डाळ अर्धी वाटी,
- एक छोटा चमचा हळद पावडर,
- जिरे,
- मोहरी,
- धने जिरे पावडर दोन छोटे चमचे,
- गरम मसाला एक छोटा चमचा,
- तिखट एक छोटा चमचा,
- आलं-लसूण-मिरची पेस्ट एक छोटा चमचा,
- हिंग पावडर अर्धा छोटा चमचा,
- एक मध्यम आकाराचा टोमॅटो,
- एक मध्यम आकाराचा बटाटा,
- दोन कांदे बारीक चिरलेले,
- असेल तर मटार अर्धी वाटी
- मीठ
- पाणी
- फोडणीसाठी थोडं तेल
कृती. :
- प्रथम कांदा, बटाटा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
- तांदूळ आणि तूर डाळ एकत्र करून दोन-चार पाण्याने धुऊन घ्यावे.
- एक लहान कुकर ठेवावा त्यात फोडणीसाठी तेल टाकावे.
- तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग टाकावा. कांदा टाकून घ्यावा त्यामध्ये आलं-लसूण-मिरची पेस्ट, एक चमचा तिखट टाकावं,
- त्यात बटाटे, मटार, टोमॅटो हे सगळं घालावं. छान परतून घ्यावं.
- त्यामध्ये गरम मसाला, धने-जिरे पावडर, हळद टाकून घेऊन नीट एकजीव करावं. थोडं शिजलं की त्यामध्ये धुतलेला तांदूळ आणि डाळ टाकून घ्यावी ते थोडं परतावं.
- कुकर मध्ये आपल्या बोटाचं दीड पेर एवढं पाणी टाकाव, त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यावे नंतर कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्याव्यात, गॅस मंद आचेवरच ठेवावा 2 शिट्ट्यांमध्ये खिचडी छान शिजते,
- कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. कुकराची वाफ गेली की झाकण उघडावे,.
- नंतर ताटात गरम गरम खिचडी सर्व्ह करावे त्यावर कोथिंबीर टाकावी आपल्याला आवडत असेल तर त्याबरोबर लोणचं पण छान लागतं, तुम्हाला जशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकतात पण खिचडी एकदम मस्त होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा