पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा

साहित्य:-

  1. पातळ पोहे अर्धा किलो,
  2. हिरवी मिरची,
  3. जिरे मोहरी,
  4. डाळ एक छोटी वाटी,
  5. शेंगदाणे एक छोटी वाटी,
  6. कढीपत्ता,
  7. हळद,
  8. धने जिरे पावडर,
  9. हिंग,
  10. लिंबू,
  11. थोडीशी साखर,
  12. लसणाच्या दोन तीन पाकळ्या,
  13. नाशिकचे सर मोरे चुरमुरे - २००ग्रॅम,
  14. तेल,
  15. मीठ.

कृती:-

  1. प्रथम पातळ पोहे चाळून घ्यावेत, नंतर एक कढई गॅसवर मंद आचेवर तापत ठेवावी. त्यामध्ये पातळ पोहे थोडे - थोडे करून भाजून घ्यावेत. 
  2. भाजलेले पातळ पोहे एका पेपर वर पसरावेत म्हणजे पोहे ना वाफ पकडत नाही, अशा पद्धतीने सगळे पोहे भाजून घ्यावेत. 
  3. त्याच कढईमध्ये दोन ते तीन डाव तेल टाकावे तेल गरम झाले, की त्यात कढीपत्ता तळून घ्यावा. तो पोह्यांवर टाकावा त्याचप्रमाणे डाळ आणि दाणे ते पण तळून घ्यावेत आणि पोहे टाकावे. 
  4. पोहे गार झाल्यावर परातीत काढून घ्यावेत हे वरील सर्व त्याच्यावर टाकायचं आपल्याला आवडत असल्यास मिरचीचे पेस्ट करावी किंवा मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून ते तेलामध्ये टाकावेत, मिरची तळली गेली की त्यात मोहरी आणि जिरे टाकावे. 
  5. आपल्या आवडीनुसार लिंबू कापून घ्याव. लिंबूचा रस काढून तेलामध्ये टाकावा थोडं तडतडेल 
  6. तेल तडतड आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपल्या आवडीनुसार एक चमचा साखर टाकावी. गॅस बंद करून घ्यावा. 
  7. त्यानंतर त्यामध्ये एक एक ते दोन चमचे हळद टाकावी. अर्धा चमचा हिंग टाकावा, धने जीरे पावडर दोन चमचे टाकावी, चवी नुसार मीठ टाकावे हे सगळं तेलामध्ये  एकत्र करून घ्यावे. हे गरम तेल आपल्या पातळ पोह्यांवर टाकावे टाकली की सगळे एकत्र कालवून घ्यावे. 
  8. परातीत नंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार चुरमुरे टाकावे, थोडे कढईत टाकून घ्यावे म्हणजे कढईत राहिलेलं तेल चुरमुर्याला लागत कशा पद्धतीने सगळे एकजीव करून घ्यावे.
आपला पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी तयार, लिंबू टाकल्यामुळे केवढ्याला एक आंबटपणा येतो. तो खूप छान लागतो तुम्ही एकदा करूनच बघा तुम्हाला पण हा तेवढा नक्की आवडेल, जर आपल्याला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खोबऱ्याचे तुकडे सुद्धा करून टाकू शकतात,

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट