मुळ्याच्या पाल्याची पीठ लावून भाजी.

साहित्य. :

  1. मुळ्याचा पाला,
  2. चना डाळीचे पीठ,
  3. ज्वारीचे पीठ,
  4. तिखट,
  5. चार-पाच लसणाच्या पाकळ्या,
  6. तेल,
  7. चवीनुसार मीठ,
  8. हळद,
  9. धने जिरे पावडर,
  10. थोडीशी कोथिंबीर. 

कृती.

  • प्रथम मुळ्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावेत, नंतर ती बारीक चिरून घ्यावे. 
  • एका भांड्यात काढून घ्यावे कुकरमध्ये ठेवून वाफवून घायवी. भाजी वाफवताना त्यामध्ये पाणी टाकू नये ती वाफेवर चांगली शिजवून जाते. 
  • गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल टाकावं त्यात जिरं मोहरी ची फोडणी द्यावी त्यात लसणाचे तुकडे करून टाकावेत थोडी हळद टाकावी, तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकावे. 
  • वाफवलेली भाजी टाकून द्यावी जर गरज पडली तर थोडं पाणी टाकावं. त्यात मीठ, धने पावडर टाकून घ्यावे. एक वाफ आणावी. 
  • त्यात थोडं दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकावे व एक ते दीड चमचा ज्वारीचं पीठ टाकावे. कढईत सगळे मिक्स करून घ्यावे चांगली वाफ आणावी. 
आपला मुळ्याच्या भाजीचा झुणका खाण्यासाठी तयार. मुळ्याचा पाला खूप पौष्टिक असतो सगळेजण मुळ्याचा पाला फेकून देतात पण तो पाला फेकून न देता, त्याची भाजी करून कावी पोळी किंवा भाकरी बरोबर हा झुणका खूप चांगला लागतो. एकदा तरी तुम्ही करूनच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट